Desktop Banner
Mobile Banner

अभ्यासू, सुनियोजित विकासासाठी !

सोनालीताई अजिंक्य घुले – मांजरी-बुद्रुक, केशव नगर, साडेसतरा नळी, शेवाळेवाडी परिसरातील लोकांच्या सेवेसाठी समर्पित आणि प्रगतीची नवी दिशा देणाऱ्या एक प्रेरणादायी नेत्या!

आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाने आणि कार्यनिष्ठेने या परिसरात विकासाचे नवे अध्याय लिहिले आहेत. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाय शोधण्याची त्यांची कार्यपद्धती लोकाभिमुख आणि आदर्शवत आहे.

लोकसेवेचे बाळकडू मला माझ्या कुटुंबातून मिळाले. नवी मुंबईमधील गावडे कुटुंब म्हणजेच माझ्या माहेरी वडीलांची, आईची आणि बहिणीची राजकीय कारकिर्द मी अगदी जवळून अनुभवली. माझे वडील श्री. अशोक गावडे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर होते. आई आणि बहिणही नगरसोविका म्हणून कार्यरत आहेत. हे सर्व पाहताना सर्वसामान्यांसाठी काम करण्याची भावना माझ्या मनात बालपणापासूनच रूजत गेली.

पुढे मी कमर्शियल पायलट म्हणून प्रशिक्षण घेतले अणि त्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वर्षे काम केले. कामाच्या निमित्ताने मी अनेक देश फिरले. विविध देश, शहरे, संस्कृती अनुभवत असताना आपल्या देशात, आपल्या शहरातही असे काम केले पाहिजे ही जाणीव मनात सदैव होती.

सुदैवाने मी घुले कुटुंबाची सून झाले. मा. सुरेश अण्णा घुलेंसारखे व्यक्तिमत्व मला सासरे म्हणून लाभले आणि अजिंक्य घुले हे पती म्हणून लाभले. या दोघांनीही सामाजिक कार्यासाठी स्वतःचे संपूर्ण जीवन समर्पित केले. आदरणीय सुरेश अण्णांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, सहकारी बँक, पीडीसीसी बँक संचालक अशा विविध पदांवर काम केले. आजही ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्याप्रमाणेच अजिंक्यने लोकसेवेचे व्रत अंगिकारून कामास सुरैवात केली होती. पंचायत समिती सभापती म्हणून काम करताना लोकहिताची असंख्य कामे करून हजारो लोक जोडले होते. परंतू दुर्दैवाने अजिंक्य घुलो यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे अकाली जाणे ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे. परंतू वैयक्तिक दुःख बाजूला ठोवून त्यांचा जनसेवेचा वारसा मी पुढे अखंड ठेवण्याचा निश्चय करून सामाजिक कार्यास सुरूवात केली.

मा.ना. अजितदादा पवार, मा. सुरेश अण्णा घुले, मा.आ. चेतनजी तुपे, मा. आ. दत्तामामा भरणे, मा. रूपालीताई चाकणकर या सर्व नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पताका खांद्यावर घेऊन जनसेवेचे व्रत अखंड ठेवण्यास कटीबद्ध आहे. प्रभाग क्र. 15 मांजरी, शेवाळेवाडी, साडेसतरानळी, केशवनगर मध्ये मी लोकहिताची कामे करण्यास सदैव तत्पर आहे. गरज आहे ती आपल्या सर्वांच्या विश्वासाची आणि साथीची

प्रभाग क्र. 15 साठी विकासाचे वचन!

Image 1 Image 2